अनेक वर्ष बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असताना अनेक अधिकारी व कर्मचारी यांना अनेक समस्या जाणवत होत्या. प्रत्येक जण आपल्या परीने आपआपल्या स्तरावर त्या दूर करण्याचा प्रयत्न करत होता, परंतू सर्वांनाच त्यात यश मिळत होते असे नाही. त्यामुळे बराचसा मराठा समाज हा मानसिक दृष्ट्या असंतुलित होता. परंतू एकटा त्याच्यावर झालेल्या अन्यायाविरुध्द वाचा फोडू शकत नव्हता. त्यामुळे अन्यायाशी संघर्ष करत स्वत:ची समजूत घालून बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्याला सोपविलेले काम प्रामाणिकपणे, निष्ठापूर्वक व जबाबदारीने पार पाडत होता.
याच परिस्थितीमध्ये काही अधिकारी, कर्मचारी महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच एकत्रितपणे मराठा समाजाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी एकत्र आले व मराठा मंडळ सामाजिक संस्थेची स्थापना करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु झाली.
सुरुवातीच्या काळात सर्व मराठा बांधवाना आपण एकजूट दाखवण्याची गरज आहे, याची खात्री पटली व गरजेच्या दिशेने पाऊले पडण्यास सुरुवात झाली. अनेक वेळा अनेक अधिकारी, कर्मचा-यांना त्यांच्या कार्य बाहुल्यामुळे एकत्र येण्यासाठी विलंब होत होता. परंतू आम्ही तुमच्या बरोबर आहोत, हे शब्दही बाकी इतरांना पाठबळ देत होते, आणि म्हणूनच प्रत्येक जण आपल्यावर टाकलेली जबाबदारी हिरीरीने पार पाडत होता. प्रत्येक जण मराठा मंडळ सामाजिक संस्था स्थापनेच्या दृष्टीने व नवीन काहीतरी चांगले कार्य करण्याच्या दृष्टीने झपाटलेला होता
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील मराठा समाजाच्या अधिकारी, कर्मचा-यांच्या प्रयत्नाना यश आले व -------------------------------------- अन्वये मराठा मंडळ सामाजिक संस्थेची कायदेशीर दृष्ट्या नोंदणी झाली. अतिशय कमी कालावधीत नोंदणी प्राप्त झाल्यानंतर मेहनत घेतलेल्या संस्थेच्या सर्व सदस्यांना आनंद झाला. या आनंदाच्या सोहळ्याची सुरुवात महाराष्ट्राचे आद्य दैवत व मराठा संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दि.----------- साजरी करून कार्यक्रमाचे प्रथम पुष्प गुंफून मराठा मंडळ सामाजिक संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. यानंतर मराठा मंडळ सामाजिक संस्थेने बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असणा-या व वरिष्ठ पदावर पदोन्नती झालेल्या अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव व स्नेह संमेलनाचा नियोजनबध्द कार्यक्रम दि.----------- अतिशय यशस्वीपणे पार पाडला. सदर कार्यक्रमास --------------- अधिकारी वर्ग व -------------- सदस्य उपस्थित होते.
समाजातील विविध स्तरावरील विविध गटाच्या व्यक्तीना त्यांना आवश्यकतेनुसार तसेच स्वत: च्या पायावर उभे राहण्याकरीता कौशल्याधिष्ठीत, व्यवसायिक शिक्षण देण्याकरीता संस्थेची निर्मिती/आर्थिक मदतीची तजवीज करण्याचे उद्दिष्ट आहे.
आधुनिक युगात शिक्षणाच्या सोयीबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता क्रिडा क्षेत्रानेही आपली अव्वल कामगिरी बजावलेलीआहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजातील विद्यार्थांना क्रिडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करुन देण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण व मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्याचा संस्थेचा मानस आहे.
सध्याच्या धकाधकीच्या युगात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. PREVENTATION IS BETTER THAN CURE ही उक्ती लक्षात घेऊन समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींना आरोग्याच्यादृष्टीने प्रशिक्षण, मार्गदर्शन व मदत क्रेंद्राचे वर्गाचे आयोजन करण्याचा संस्थेचा मानस आहे.
चांगल्या आरोग्यासाठी चांगले पर्यावरण असल्याची आवश्यकता सद्यस्थितीत खूप महत्त्वाची आहे. याचेच भान ठेवून पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण व मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्याचा संस्थेचा मानस आहे.
मराठा मंडळ सामाजिक संस्थेच्या सामाजिक उत्तरदायित्व म्हणून महा पुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, राष्ट्रीय सण साजरे करणे व त्यांच्या कार्याचा गौरव करुन समाजाच्या वाटचालीसाठी त्याचा उपयोग करुन घेणे. सदस्यांच्या व त्यांच्या कुंटुंबाच्या करमणुकीकरीता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे. सदस्यांच्या व त्यांच्या कुंटुंबाकरीता प्रशिक्षण व मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्याचा संस्थेचा मानस आहे.
बृहन्मुंबइ महानगरपालिका क्षेत्रातील बरचसे अधिकारी व कर्मचारी यांची पार्श्वभूमी ही शेतकरी कुंटुंबाची असल्यामुळे मराठा मंडळ सामाजिक संस्थेचे सामाजिक उत्तरदायित्व म्हणून गावोगावी कृषी विषयक प्रशिक्षण व मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्याचा संस्थेचा मानस आहे.
वरील सर्व उपक्रमाचे यशस्वीपणे आयोजन करतांनाच स्वत: च्या विकासा बरोबरच बृहन्मुंबई महानगरपालिकेची मान सतत उंचावत ठेवणे हाही मराठा मंडळ सामाजिक संस्थेचा उदात्त हेतू आहे.